टॉप बातम्या

शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटकपदी डिमन टोंगे यांची नियुक्ती


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील कोकण, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र या विभागांतील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये वणी-आर्णी विधानसभा क्षेत्रासाठी महिला जिल्हा संघटकपदी डिमन टोंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डिमन टोंगे यांच्या नियुक्तीमुळे वणी-आर्णी परिसरातील महिला संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. पक्ष संघटन अधिक सक्षम करण्याबरोबरच महिला सक्षमीकरण, जनसंपर्क आणि पक्षाच्या विचारांचा अधिक प्रभावीपणे प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत संघटन बळकट करण्यासाठी त्या सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();