सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील रंगनाथ स्वामी फार्म प्रोडूसर कंपनी लिमिटेड वणी, व व्हपको नागपूर मार्फत खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्व प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार संस्थेचे अध्यक्ष संजय खाडे व संचालिका संगीता खाडे यांच्या तर्फे सुभाष मत्ते रा. वणी, उमेश महारतळे रा. मजरा वसंता नागपुरे रा. नांदेपेरा यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
यानंतर मारेगाव मंगरूळ येथे जय किसान कृषी माल प्रक्रिया सह. संस्था वणी मार्फत संस्थेचे अध्यक्ष संजय खाडे व संचालक संगीता खाडे यांच्या हस्ते प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. रामकृष्ण देवाजी उपरे रा. घोनसा दिगंबर नानाजी उपरे रा. घोन्साअमोल मनोहर चटकी रा. जळका दिगंबर नानाजी उपरे रा. घोन्सा आनंदराव राघोबा किनेकार रा. चिंचाळा नारायण पुरुषोत्तम नावडे रा. चिंचाळा शेतकऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, चण्याची ऑनलाईन नोंदणी दिनांक 31. 3 .2023 पर्यंत राहणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी दोन्ही सेंटरवर आपली चण्याची नोंदणी करून घ्यावी व चना नाफेडच्या खरेदी केंद्रावर आणावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले आहे.