सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : येथील मैत्री कट्टा ग्रुप द्वारा महिला दिनानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक रॅली ने अवघ्या शहरवासीयांचे लक्ष वेधले. खास महिलांसाठी आयोजित नृत्य स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
४० वर्षापूर्वी रंगमंच गाजविणाऱ्या मारेगाव येथील युवक - युवतींनी कालांतराने मैत्री कट्टा ची पुन्हा एकदा स्थापना केली. या मंडळींनी मारेगावातील सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. गत दोन वर्षांपासून हे मैत्री कट्टा ग्रुप महिला दिनानिमीत्ताने भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यावेळी शहरातून महिलांची रॅली काढण्यात आली. यात आदिवासी नृत्य, लेझिम पथक,राजस्थानी गरबा , भांगडा न्रुत्य, कराटे पथक,भजन मंडळ आदी देखावे सादर करण्यात आले. खास महिलांचे हिरकणी ढोल ताशा पथक यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. हिरकणी ढोल पथकाची उभारणी करण्यात विशेष सहकार्या करिता रुपेशजी चौधरी तसेच व्हिकी जुमनाके यांना सन्मानीत करण्यात आले. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मार्गक्रमण करीत संपुर्ण शहरभर निघाली होती.
दुसऱ्या दिवशी खास महिलांसाठी एकल व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांची भरगच्च उपस्थिती होती. एकल नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रियांका घाने हिला मिळाला. द्वितीय पुरस्कार प्रियांका ढवळे व सोनल भांसे यांना देण्यात आला. राणी गाणार ही तृतीय पुरस्काराची मानकरी ठरली. जयश्री कल्लेवार हिला प्रोत्साहन पुरस्कार मिळाला. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार जय अंबे ग्रुप, द्वितीय शिव तांडव ग्रुप, तृतीय शक्ती ग्रुप तर उतेजनार्थ पुरस्कार नारीशक्ती ग्रुप ला मिळाला.
कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी मैत्री कट्टा ग्रुप चे दिपक जुनेजा, बिना हेपट (दुपारे) , प्रतिभा डाखरे ,उदय रायपूरे , किशोर पाटील,खालिद पटेल, आदिनी परिश्रम घेतले. गणेश पावशेरे गजानन जयस्वाल, मिलिंद डोहने, सुनील भेले ,शहाबुद्दीन अजानी ,नर्गिस जिवानी, संजय साठे, दुष्यंत जैस्वाल ,शैलजा ठानेकर वनमाला आडकिने,व मंजुषा भगत आदी उपस्थित होते.