सौ प्रविणा सतीश गेडाम यांचे निधन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील राजे ऍम्ब्युलन्स चे सर्वेसर्वा सतीशभाऊ गेडाम यांची पत्नी सौ प्रविणा सतीश गेडाम (अंदाजे वय 35) यांचे दीर्घआजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गेडाम कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

सौ प्रविणा गेडाम ह्यांची गेल्या काही वर्षपासून प्रकृती बरी नव्हती, अशातच आज त्यांची सकाळी 11.30 वाजता च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांचे पार्थिवावर गुरुवार दि.26 जाने. ला दुपारी 4.00 वाजताच्या दरम्यान, गणेशपूर येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. सौ प्रविणा यांचे पश्चात पती,मुलगी, सासू व सासरे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.