टॉप बातम्या

आजही स्त्रियांवर होणारे अन्याय थांबले नाही - बेबीताई मेश्राम


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : जग जरी प्रगती करीत असले तरी या प्रगतीत पुरुषाच्या बरोबरीचा वाटा आहे याला जग नाकारु शकत नाही, तरीही जगाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नसून आजही स्त्री ही हिंसा व अत्याचाराची बळी ठरत आहे असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.बेबीताई मेश्राम यांनी नुकताच रत्न श्री 2022 विजेत्या मा.मनिषाताई तिरणकर यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष पदावरुन बोलत असतांना मांडले.
वणी येथील शासकीय विश्राम गृहात अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा.मनिषाताई तिरणकर यांना नॅशनल चाईल्ड अँन्ड वूमन डेव्हलपमेंट कौन्सिल मुंबई च्या वतीने नूकताच रत्न श्री 2022 आवार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त त्यांचा अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषद व सक्षम बहुउद्देशीय संस्था वणी च्या वतीने जाहीर सत्कार सोहळा वणी येथील विश्राम गृहात ठेवण्यात आला होता.
या सोहळ्याच्या अध्यक्षा मा.सौ.बेबीताई मेश्राम ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष, वणी, क्रांतिवीर बिरसामुंडा सार्वजनिक वाचनालय वणी चे अध्यक्ष मा.रमेश मडावी, अ.भा.युवा संवैधानिक हक्क परिषदेचे तालुका अध्यक्ष मा.अशोकजी दुर्गमवार, सौ.उज्वलाजी निब्रड या होत्या.
सत्कार सोहळ्याची सुरुवात प्राचार्य मोतीरामजी परचाके सर,व कैलासजी मेश्राम यांनी सादर केलेल्या स्वागत गीतांनी झाली. या प्रसंगी प्रमुख अतिथिंचीही भाषणे झालीत.
या सत्कार सोहळ्याचे प्रास्तविक सक्षम बहुउद्देशीय संस्था वणी च्या संचालक मा.कर्मा तेलंग यांनी केले, संचालन कु.सिमा कुमरे यांनी केले. आभार अ.भा.विद्यार्थी संवैधानिक हक्क परिषदेचे चेतन सुरपाम यांनी मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कैलासजी मेश्राम, दत्ताजी गावंडे, महादेव सिडाम, संतोष चांदेकर, सौ.मंथना सुरपाम आदिंनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();