सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मौजा पार्डी येथील रहिवासी शेतकरी कैलास चंद्रभान गाडगे (वय 60) यांनी आज सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या शेतात ही घटना उघडकीस आली.
कैलास गाडगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.