सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी शहरातील जैन ले-आऊट येथील रहिवासी असलेला हा युवक काही कामानिमित्त दुचाकीने (MH 29 B 1810) वरोराकडे जात होता. दरम्यान, वणीकडे येत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसने (MH 07 C 9375) वर्धा नदीच्या पाटाळा पुलाजवळ त्याच्या दुचाकीला आमनेसामने जबर धडक दिली. या अपघातात संजय पिंपळकर या युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
माजरी पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास माजरी पोलिस करीत आहे.