टॉप बातम्या

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई : एकाच नंबरवर धावणाऱ्या ‘क्रूझर’ गाड्यांचा पर्दाफाश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) फुलसावंगी येथे धडक कारवाई करत एकाच नंबरवर धावणाऱ्या ‘क्रूझर’ गाड्यांचा मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून या प्रकरणामुळे वाहन फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ORCF TRAX CRUISER प्रकारातील दोन गाड्या एकाच नोंदणी क्रमांकावर चालविल्या जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार पथकाने फुलसावंगी परिसरात सापळा रचून कारवाई केली. तपासादरम्यान दोन्ही वाहनांचे चेसिस आणि इंजिन क्रमांक संशयास्पद आढळून आले.

पोलीसांनी तत्काळ दोन्ही वाहने जप्त केली असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही वाहनांचा समावेश आहे का त्याबाजूने पुढील तपास सुरू आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();