सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : ७ जानेवारी २०२३ ला तालुक्यातील बामर्डा येथे भिमा कोरेगांव शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्शल विद्याधर भालेराव सर तर प्रमुख वक्ते म्हणून मार्शल विकास नरांजे प्रवक्ता समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य हे होते. कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. प्रशांत पाटील होते. प्रास्ताविक मार्शल गौतम तोतडे तालुका प्रवक्ता समता सैनिक दल मारेगांव यांनी केले.
बौद्धांचा शौर्यशाली इतिहास ह्या विषयावर मार्शल विलास नरांजे सर यांनी तब्बल दीड तास व्याख्यान देऊन प्रकाश टाकला. त्यानंतर वरोरा चे प्रसिद्ध कव्वाल मुस्ताक भाई व संच यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम झाला.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्याकरिता मार्शल गौतम तोतडे, नत्थूजी ठमके, तेजस वाघमारे, प्रशांत वाघमारे, अनिकेत काटकर, आशिष पाटील, सुमित तोतडे, प्रफुल वाघमारे, समीर काटकर तसेच रमाई महिला मंडळ बांमर्डा यांनी अथक परिश्रम घेतले.
यामध्ये महापरिनिर्वाण दिनी मुंबई येथे आयोजित समता सैनिक दलाच्या वतीने आयोजित शिबिरामध्ये सहभाग नोंदवलेल्या मार्शलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मार्शल योगेश दिवे सर तर आभार मार्शल सौरभ घायावन यांनी मानले.