सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सिंदेवाही : सिन्देवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेञ मधील चारगांव येथे दि.९/१/२३ ला वाघाने एका युवकाला ठार केल्याची घटना घडली. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला ढोरफोडी या नावाने ओळखत असणार्या या जागेवर झुडपी जंगल परिसररात एक शेळी मृत अवस्थेत आढळून आली होती.
पोलिस स्टेशन सिन्देवाही येथे युवक बेपत्ता असल्याची तक्रार २ दिवसा अगोदर दाखल करण्यात आली होती. मृत युवकाचे नाव श्रीकांत पटवाळु श्रीरामे वय १९ वर्ष असे आहे. रा. चारगाव (कुकडहेटी) येथुन तो लागुन असलेल्या शेतावर सायंकाळी पाचच्या दरम्यान कुकडहेटी येथे आला होता.
काल या परिसरात लोकांच्या उपस्थितीने जत्रेचे स्वरुप आले होते. कमालीची गर्दी बघायला दिसत होती. नागरिकांचा वनविभागावर रोष पहायला दिसत होता. अशात सिन्देवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेश घारे, बिट जमादार विनोद बाबणे, रणदिर मदारे यांच्या समवेत पोलिसांचा ताफा शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी रोष व्यक्त करीत असलेल्या नागरिकासोबत चर्चा करीत होते.
प्राप्त माहितीनुसार शिवणी वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे हे आपल्या कर्मचार्यासोबत घटनास्थळी दाखल झाले होते. मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनासाठी व वैद्यकीय अहवालासाठी वनविभागाने शरीराचे काही अवयव ताब्यात घेवुन सिन्देवाही येथील तालुका शासकीय दवाखान्यात पाठविले आहेत. त्याचा अहवाल अजुन प्राप्त व्हायचा आहे.
वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या मागावर असल्याचे दिसुन आले. पण त्या नरभक्षी वाघाचा अद्यापही थांगपत्ता लागला नाही. एका युवकाचे मृत अवशेष आढळून आल्याने यासाठी नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.