सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : सोमवार दि.09 जानेवारी 2023 ला उपसरपंच पदभार कार्यक्रम दुपारी 2.00 वा.पार पडला. नूतन लोकनियुक्त सौ.उषाताई देरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच म्हणून श्री दिपक श्रीहरी कळस्कर यांची सर्वानुमत्ते निवड करण्यात आली.
यावेळी मारेगांव पं.स.कृषी अधिकारी श्री वाघमारे साहेब, ग्रामसेवक श्री.जे.बि.फुलझेले, तलाठी जिवतोडे, ग्रामराेजगार सेवक श्री.याोगेश्वर कापसे, ग्रामपंचायत सदस्य, बालाजी आत्राम, संजय चिने, साै.डाेळस ताई, साै.आत्रामताई व कर्मचारी पुरुषाेत्तम चाैधरी, कवडु फटाले व इतर गावकरी मंडळी यावेळी उपस्थित हाेते, अशा प्रकारे सर्वानुमते एकमताने निवड प्रक्रिया शांततेत पार पडली.