टॉप बातम्या

निंबाळा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न


सह्याद्री चौफेर : कुमार अमोल 

वणी : 9 जानेवारी 2023 रोजी मानव विकास महामंडळ अंतर्गत निंबाळा येथे क्रांतिज्योत्ती सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र मारेगाव, सकस आहार व तिरंगा थाळी व शोभा यात्रा आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात उदघाटक पदी गावचे सरपंचा सुनीता ढेंगळे, कार्यक्रामाच्या अध्यक्षा सौ वृषालीताई प्रवीण खानझोडे (माजी उपसभापती प.स. वणी), पशुैद्यकीय ताकसाडे मॅडम, आरोग्य सेविका मंजुषा मांडवकर, हनुमंते  मॅडम, अंकतवार मॅडम व लोकसंचालित साधन केंद्राचे सह्योगिनी अनिता वसाखेताई व सचिव सुनीता चिडे, गाव प्रतिनिधी प्रणाली कुत्तरमारे व शारदा माता म. ब. ग. सोना माता, एकता, समता, श्री गणेश स्त्री शक्ती जय माता दी, लक्ष्मी, सुशील महिला बचत गट निंबळा व गावातील सर्व महिला बचत गटाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या.  
या वेळी महिलांचा स्पर्धा व मैदानी खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, महिलांनी उस्फुर्त भाग घेतला व आपल्या खेळाचा प्रदर्शन केले, उपस्थितीत महिला मध्ये जोशपूर्ण वातावरण बघायला मिळाले. कार्यक्रमाचे संचालन अनिताताई वसाके तर आभार व्यक्त सुनीता चिडे यांनी केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();