टॉप बातम्या

मारेगाव तालुक्यातील उपसरपंच पदाच्या निकालात 'हे' झाले पास

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर उपसरपंच पदाची 9 ते 10 जानेवारी 2023 रोजी नूतन लोकनियुक्त सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली निवड ग्रामपंचायत कार्यालयात शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.
यामध्ये‎ संतोष मारोती महाडूळे (नवरगाव), अजय राठोड (हिवरी), अतुल गाणफाडे (गौराळा), नरेंद्र आत्राम (शिवणी), किशोर मंदे (कानडा), यांची मंगळवार 10 जानेवारी रोजी उपसरपंच पदी निवड करण्यात‎ आली. तसेच वनोजा (देवी) येथील उपसरपंच पदी प्रशांत भंडारी, मार्डी येथील उपसरपंच पदी सुधाकर डाहुले, कोसारा उपसरपंच पदी सचिन पचारे, तर वेगांव उपसरपंच पदी दिपक कडस्कर यांचा समावेश आहे.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या नव निर्वाचितांचा स्थानिक सभागृहात मध्ये सत्कार करण्यात आला असून पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
 ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवडणुक प्रक्रियेकारिता मारेगाव पंचायत समिती, तहसील च्या वतीने विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्या उपस्थितीत दि.9 जाने. आणि 10 जाने 2023 निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली, यावेळी नवनिर्वाचित नऊ ग्राम. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक महीला व पुरुष मोठ्या‎ प्रमाणात उपस्थित होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();