टॉप बातम्या

मुकुटबन पोलीसांची कोंबड बाजारावर धाड; सात आरोपींना केली अटक


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 
9922771734

झरी : तालुक्यातील मुकुटबन पोलिस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या अडेगाव शिवारात खुल्या मैदानात सूरू असलेल्या कोंबड बाजारावर गुप्त माहिती आधारे पोलिसांनी धाड मारली. यामध्ये सात आरोपींना रंगेहात अटक केली असून,  2 लाख 12 हजार 500 रूपयांचा मुदे्माल जप्त करण्यात आला. 

अमोल आनंदराव मत्ते (42) रा. आनंदनगर (वणी), सुनिल अशोक आवारी (48) रा. अडेगाव (ता झरी), बाबाराव नानाजी हिवरकर (48), वामन अर्जुन धानोरकर (40), विठ्ठल उध्दव झाडे (51) तिघेही राहणार अडेगाव ता. झरी, शिवराम गुलाब गिरसावळे (वय 60) रा डोंगरगाव ता.झरी, निलेश लक्ष्मण आत्राम (31)रा. रामपुर (ता. झरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सदरची कार्यवाही डॉ पवन बन्सोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली अनिल सकवान पोलीस उपनिरीक्षक, खुशाल सुरपाम ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, पुरुषोत्तम घोडाम ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार संजय खांडेकर संदिप कुमरे /८१७ सर्व पो.स्टे. मुकूटबन यांनी केली आहे.
Previous Post Next Post