सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
तालुक्यातील अर्जुनी येथील प्रमोद नामदेव रामपुरे (26) या युवकाचा खून घोडदरा शिवारातील धनवे यांच्या शेतात 5 ऑगस्ट 2021 रोजी संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याबाबत मारेगाव पोलिस ठाण्यात मृतक भावाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेकडवाई येथील आरोपी देवीदास नाना रामपुरे (28) व सत्यपाल वासुदेव आत्राम (29) या दोघांनी संगनमत करून माझ्या भावाचा खून केला, अशी तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या उघडकीस आलेल्या घटनेला जवळजवळ सव्वा वर्ष होत आहे.
तत्कालीन ठाणेदार मंडलवार यांनी आरोपींना पकडण्यासाठी एक पथक स्थापन करूनही संशयित आरोपी सापडत नव्हते. त्यामुळे गेल्यामुळे एक ते सव्वा वर्षापासून पोलिसांना आरोपींना पडकण्याचे आवाहन होते, अशातच दि.19 शनिवारला या प्रकरणातील हे दोन्ही आरोपी देवीदास नाना रामपुरे (रा. खेकडवाई) यांचे शेतात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सापळा रचून पोलिसांनी शनिवारी रात्री दोन्ही आरोपींना अटक केली. त्या दोघांना मारेगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.