टॉप बातम्या

परप्रांतीय मजुरांवर वाघाची झडप, ब्राम्हणी येथील घटना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील ब्राम्हणी येथे टॉवर चे काम करणाऱ्या इसमांवर वाघाने हल्ला केला. त्यात तो इसम गंभीर जखमी झाला असून ही घटना आज गुरुवारी पहाटे ला घडली.

तालुक्यात वाघाचा मुक्त वावर असल्याने कुठे ना कुठे या वाघाचे दर्शन नागरिकांना होत आहे. त्यामुळे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात वाघाची दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेत मजूर भयभीत झालेत. अचानक वाघाचे दर्शन होऊ लागले असतांना ब्राम्हणी येथे टॉवर चे काम करणाऱ्या एका मजुरावर वाघाने झडप घातली. उमेश पासवान (35) (रा बिहार) त्यात उमेश यांना गंभीर दुखापत झाली. वाघाने हल्ला केल्याचे दिसताच सोबतच्या इतर लोकांनी आरडा ओरड केल्याने वाघाने धूम ठोकली. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते.
तालुक्यात वाघाचा मुक्त संचार आता डोकेदुखी ठरत असून आठवड्यापूर्वी भुरकी येथील एका पंचवीस वर्षीय युवकाला ठार केले होते. तर दोन दिवसापूर्वी नागरिकांनी मनिष नगरात वाघाचे दर्शन झाल्याचे चर्चा आहे. 

त्यामुळे सध्या वाघाची जोरदार चर्चा सर्वत्र होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, परिणामी मुक्त वावर असणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
Previous Post Next Post