सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरु आहे. गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूच्या व्यसनामुळे पारिवारिक कलह निर्माण होऊन अनेक कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहेत. मच्छिन्द्रा गावात सुरु असलेली अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी 30 ते 32 महिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात पोहचून निवेदन देत अवैध दारू विक्रेत्यावर तसेच दारू पुरवठा करणाऱ्यावर कडक कारवाई मागणी केली.
मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायत असून मच्छिन्द्रा गावात अवैध दारू विक्री खुलेआम सुरु आहे. यामुळे गावातील वातावरण कलूषित होत असून महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीला घेवून मच्छिन्द्रा येथील दारूविक्री कायमची बंद झाली पाहिजे याबाबतचे निवेदन मारेगाव येथील पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत उपसरपंचा कंचना मेश्राम, सदस्य विद्या ताजने, बेबीनंदा मेश्राम, संगीता पारोधी, सिंधू सातपुते, साधना ढेंगळे, पल्लवी चट्टे, दीपा पिदूरकर, दिक्षा पिदूरकर, उज्वला गेडाम, लता गेडाम, रेखा ढवस, प्रगती पिदूरकर, अर्चना झाडे, नंदा पारखी, रंजना झाडे, रुपाली सोनटक्के, रत्नमाला काकडे, विठाबाई बरडे, रंजना बरडे, भारती पेंदोर, सोनू पिदूरकर, सिंधू मत्ते, प्रेमीला वडस्कर, कांता झाडे, निलिमा कुळसंगे, संध्या सोयाम, माया बदकी, दर्शना कुमरे, प्रणिता बुजाडे, झिबलाबाई मेश्राम, बायजाबाई आत्राम आदींची उपस्थिती होती.