टॉप बातम्या

कायरच्या "बुद्धिवान"ची एम.पी.एस.सी मधुन ए.एस.ओ,एस.टी.आय व पी.एस.आय साठी भरारी

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील कायर येथील बुद्धिवान बिंबिसार निखाडे यांनी एकाच वेळी एम.पी.एस.सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत बाजी मारली. ASO,STI,PSI या तिन्ही पोस्टमध्ये राज्यात ASO.(एस.सी) कॅटेगिरी मध्ये प्रथम रँक मिळवून कायर गावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला,तर STI मध्ये तिसरी रँक मिळवून PSI साठी पात्र झाला आहे.
वणी तालुक्यातील नावलौकिक मिळवून देणारा बुद्धिवान हा एका गरीब कुटुंबातून समोर आला असून आई-वडिलांकडे तीन एकड जमिनीवर उदरनिर्वाह चालतो, त्यांना तीन मुले, परिस्थिती बेताची, बुद्धिवानचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, कायर येथे झाले तर माध्यमिक शिक्षण विवेकानंद विद्यालय, कायर येथे झाले, अकरावी बारावी एस.पी.एम महाविद्यालय वणी येथे झाले तर पदवी शिक्षण लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे पूर्ण करून 2019 ला स्वतःच्या पायावर उभा राहण्या हेतूने पुण्याला रवाना झाला. व स्पर्धेच्या युगात एम पी एस सी च्या तयारीला लागला व लगेच 2020 च्या एमपीएससीच्या परीक्षेला बसून पहिल्याच प्रयत्नात .ASO, STI, PSI मध्ये यशस्वी झाला. 2021च्या परीक्षेत सुद्धा ASO, STI, PSI पात्र झाला.
 बुद्धीवांनच्या यशाला प्रयत्नांची जोड असून बुद्धिवांनचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बुद्धिवांनच्या यशाचे श्रेय तो आई-वडील नातेवाईक मित्रमंडळी परिवार व गुरुजनांना देतो. त्याच्या यशाचा खरा सिंहाचा वाटा बुद्धिवांनचे मोठे बंधू श्री. पंचशील निखाडे यांना देतो आणि युवावर्गांना यशाचे सूत्र सांगू इच्छितो की, "जिद्द ठेवा, संयम ठेवा, सातत्य ठेवा, नक्कीच यश मिळेल".
Previous Post Next Post