कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वर्धा : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने ग्रामोत्थान समिति वर्धा जिल्हा च्या वतीने जिल्ह्यात २ ऑक्टोबर गाँधी जयंती ते २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन दरम्यान समग्र ग्रामोत्थान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सेवाग्राम आश्रम येथे बापूंना अभिवादन करत सर्व धर्मीय प्रार्थनेने या अभियानाचा शुभारंभ या अभियानाचे मुख्य प्रेरक प्रा नितेश कराळे सर तसेच अभियानाचे संयोजक विशाल चौधरी यांनी केले.ज्यामध्ये संविधानाचे आधारे जनतेचे अधिकार व कर्तव्य, रोजगाराच्या दृष्टीने ग्रामोद्योग, पंचायत राज - ग्रामसभा सशक्तीकरण, शेती समोरील अडचणी, युवकांची भूमिका, ग्रामआरोग्य, ग्रामशिक्षण, महीलोन्नती, अर्थातच बापूंच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण ग्रामाच्या उत्थानासाठी आठही तालुक्यात आदर्श विचारांचा जागर करण्यासाठीं या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामधे प्रबोधन, पथनाट्य, भजन, युवा संवाद, सभा आदी प्रभावी माध्यमातून ग्रामस्थाशी संवाद साधत हे अभियान किमान 3 लाख लोकांपर्यंत पोहचून त्यांना ग्राम ऊत्थाणाच्या प्रवाहात आनायचे आहे असे नितेश कराळे यांनी उपस्थींत पत्रकार बांधवासोबत बोलताना व्यक्त केले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी आठही तालुक्यातील अभियान समन्वयक यांच्याशी संपर्क करून या अभियानात युवकांना सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळेस केलें.
यावेळी मोहित सहारे, अतुल लेंडे, सागर चौधरी, गोविंदा पारीसे, रोहन आदेवार, अरविंद तायडे, निखिल ढोकपांडे, सौरभ, शुभम सोळंकी उपस्थित होते.