टॉप बातम्या

जनामाय कासामायेच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील वनोजा देवी येथील जनामाय कासामाय देवी चा नवरात्रौ महोत्सव सुरु झाला आहे. महोत्सवात दररोज सकाळी सात व सायंकाळी सात आरती होते. आरतीला भाविक अणवानी येतात. वणी-मार्डी वरून जाण्यास खासगी वाहने उपलब्ध असतात. भाविकासाठी बसण्यासाठी पेंडाल ची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भाविक दसरा विजयादशमी पर्यंत येथे येतात.            (भाविक दुरदुरून दर्शनासाठी आलेले)

जनामाय कासामाय देवी मंदिरात गावोगावावरून भजन मंडळी येवून भजनाचा कार्यक्रम करतात. येथील हेमाडपंथी मंदिर असून भाविक मोठ्या सदभावनेने येवून मनोकामना पूर्ण करून जातात. नवरात्रात दररोज भाविकांची गर्दी पाहता, व्यवसायिकांना दुकाने थाटली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भंडारी भाविकांच्या सेवेसाठी महोत्सवात सेवा देत आहेत. भाविकांनी सहकार्य करून नवरात्र उत्सव मनोभावनेने करावा असे आवाहन केले आहे. दसऱ्याच्या सायंकाळी आरतीनंतर उत्सवाची सांगता होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();