अमोल टेकले | सह्याद्री चौफेर
यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच शोभा दंडे ह्या होत्या, प्रमुख पाहुणे म्हणुन उप सरपंच प्रतिनिधी शामराव धबडगे, पोलीस पाटील भागवत कोल्हे, ग्रामसेवक शिवाजी भुसलवाड, माजी सरपंच शेषेराव दंडे, किशोर पाटील, राजाराम चाळणेवाड, गंगाधर गिरोड, पांडुरंग गाडे, संजय टेकले, ग्रामपंचायत सदस्या साहेबराव मंगलआर्पे, साईनाथ दंडे, सुभाष सकिरगे, सुभाष गोपीनवार, साईनाथ मुंगल, अवधुत मलदोडे अदिंची प्रमुख उपस्थीती होती. या वेळी ग्रामसभेत तंटामुक्ती समितीचा शासनस्तारावरील शासनाच्या परीपत्रकाचे वाचन करण्यात आले.
ग्रामसभेमध्ये गावातील अध्यक्ष पदासाठी नागोराव चाळणेवाड यांचे नाव सुचविण्यात आले होते. तर उपाअध्यक्ष पदासाठी अमोल टेकले यांच्या नाव सुचविण्यात आले होते. ग्रामसभेत एक मुकाने अध्यक्ष पदी नागोराव चाळणेवाड तर उपाध्यक्ष पदी अमोल टेकले यांची निवड करण्यात आली आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थाकडुन स्वागत करण्यात आले आहे. ग्रामसभेचे सुत्रसंचालन गंगाधर गिरोड सर यांनी केले तर, आभार ग्रामविकस अधिकारी एस.पी.भुसलवाड यांनी मानले. सर्व गावकरी व उपस्थितांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.