टॉप बातम्या

मारेगाव: शेतकऱ्यांना तात्काळ लाभ द्या,नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना घातले साकडे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : 45 कोटी तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, निधी वाटपाच्या यादी कोणी बनवायची या वादात निधी वाटपाचे काम अडकले आहे. कृषी विभाग ही जबाबदारी महसूल विभागावर ढकलत आहे, त्यामुळे या वादात तालुक्यातील वीस हजार शेतकरी भरडले जात आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील उत्पन्न घटले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी मारेगाव येथील शेतकऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

जिल्ह्याला पावसाने झोडपलं आहे व आता कर्मचारी झोपत आहे. शेतकऱ्यांची अवस्था "आकाश से गिरा आणि खजूर मे लटका" अशी परिस्थिती झाली आहे. प्रत्येक तालुक्यात अनुदान प्राप्त झाले परंतु कृषी व महसूल यांच्या चुकी मुळे अडकलेले आहे तरी, हा तिढा लवकरात लवकर सोडवून शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळावा याकरिता मारेगाव नगरपंचायत चे नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रविंद्र पोटे, अतुल वटे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, समीर कुडमेथे, धिरज डांगाले हे उपस्थित होते. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();