Top News

माजी उप सरपंचाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : शहरात धक्कादायक अशी घटना घडली. चक्क! झुणका भाकर केंद्रा वर जेवण करतांना एका 60 वर्षीय इसमाचा झुणका भाकर केंद्रातच मृत्यू झाल्याची घटना आज दि.3 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता चे सुमारास घडली. 

भास्कर दौलत वेले रा. वेगाव असे झुणका भाकर केंद्रात भाकर खातांना मृत्यू झालेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे.
    
धकाधकीच्या काळात व अँड्रॉइड युगात मृत्यू आता जवळ येऊ लागल्याने  अचंबित करणारे अनेक उदाहरणे आपण माध्यमातून वाचत असतो. असाच एक धक्कादायक प्रकार आज दुपारी तीन वाजताचे सुमारास वेगाव येथील भास्करराव वेले हे मारेगाव येथील एका झुणका भाकर केंद्रात गेले. भाकरीचा आस्वाद घेत असतांना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि काही कळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 
       
दरम्यान, त्यांचा मृतदेह ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला असून, नेमका मृत्यू कशाने झाला? याबाबत शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईलच..! 

Post a Comment

Previous Post Next Post