कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : गावागावात घोणस अळीचा शिरकाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात घोणस अळी विषयी भीती कायम आहे. सालेभट्टी येथील जयवंत लीलाधर कोरझरे (23) या युवकाला आज सोमवारला दुपारी तिन वाजताचे सुमारास शेतामध्ये फवारणी करित असताना घोणस अळीने दंश केले. त्यामुळे त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यात घोणस अंळीने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेतकरी लोकरी मावा आणि हुमणी अशा संकटातून मार्गक्रमण करीत असताना आता शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचे नवे संकट उभे केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नवयुवक आपल्या शेतात फवारणी करित असताना अचानक त्याच्या हाताच्या बोटाला दंश झाला. त्यामुळे त्याला वेदना झाल्या. दरम्यान, त्याने अळीचे निरीक्षण केले आणि घोणस अळी असल्याचे स्पष्ट झाले. युवकाला वेदना असाह्य होऊ लागल्याने त्याला तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, जयवंत वर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती सध्या तरी स्थिर आहे.