Top News

आजचा चौथा दिवस बेमुदत आंदोलन सुरूच,प्रशासन उदासीन धोरण अवलंबुन असल्याची टीका; महिलाचा एल्गार


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : राजूर येथे रेल्वे व वेकोलीचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने बेमुदत आमरण उपोषणाला वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून उपोषणाला चार महिला सुरुवात करीत आहेत.

राजूर येथे आलेल्या वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांच्या कोळसा सायडिंग व वेकोलीचे होत असलेले खाजगीकरण ह्यामुळे येथील राहिवासीयांना त्यांची राहत असलेली घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे येथील कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्रालगत असल्याने गावात प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन गावात वेगवेगळ्या आजारांचे प्रादुर्भाव होत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथे सुरू असलेल्या रेल्वे कोळसा सायडिंग व कोल डेपो ला स्थानिक स्वराज्य संस्थेची व प्रदूषण नियंत्रण बोर्डाची परवानगी नसल्याने त्या अनधिकृत आहेत. या संदर्भात गेल्या 10 महिन्यापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी अवैध सायडिंग हटविण्यासंदर्भात आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी मात्र गेल्या 1 महिन्यापासून झाली नाही. त्यामुळे शेवटी राजूर बचाव संघर्ष समिती चे वतीने दि. 17 ऑक्टो 22, सोमवार पासून बेमुदत आमरण उपोषण वणी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर सुरू करण्यात आले आहे.

ह्या आमरण उपोषणाला सौ. दिशाताई अमृत फुलझेले, सौ. नाजूकाताई प्रशांत बहादे, सौ. वीणाताई अमर तितरे व सौ. शालूताई संजय पंधरे ह्या बसल्या आहेत.

आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ. विद्याताई पेरकावार, सौ वृषालीताई खानझोडे, संघदीप भगत,  अशोक वानखेडे, मो. असलम, डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, अ‍ॅड.. अरविंद सिडाम, प्रवीण खानझोडे, जयंत कोयरे, सावन पाटील, अमृत फुलझेले, नंदकिशोर लोहकरे, प्रदीप बांधुरकर   साजिद खान, नितीन मिलमिले, अमर तितरे, अभिषेक अंडेल, सनी राजनालवार, अजित यादव, अनवर खान, अकरम वारसी व अन्य मेहनत घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post