सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील पिके पूर्णतः नष्ट झाले असून दिलासा मिळणे करिता शासनाने दुष्काळ निधी मंजूर केला, त्यामुळे दुष्काळ निधी शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मिळावा अशा आशयचे निवेदन मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले.
माजी मा श्री आमदार वामनरावजी कासावार व मा श्री नरेंद्र पाटील ठाकरे सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करतांना मा श्री नरेंद्र पाटील ठाकरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव, सौ अरुणाताई खंडाळकर माजी सभापती जि प यवतमाळ, श्री वसंतराव आसुटकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव, श्री मारोती गौरकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव, श्री शंकरराव मडावी, नगरसेवक तथा अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, मारेगाव, रमण डोये, गुणाजी थेरे,प्रफुल विखणकर,अरविंद वखनोर, गोपाल खामणकर, विनोद आत्राम,यादव काळे यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात पुढे नमूद केले की, मारेगाव तालुक्याला निधीचे पैसे मागील 15 ते 20 दिवसापूर्वीच तहसील कार्यालयाला पैसे पोहचले. परंतु कधी तलाठी संप तर कधी ग्रामसेवकाचा बहिष्कार अशा या ना त्या कारणाने शेतकऱ्यांना पैशाचे वितरण झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळी अंधारात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच 2 ते 3 दिवसापासून तालुक्यातील 5 ते 10 गावांना दुष्काळ निधीचे वाटप सुरु झाले असून आणखी तालुक्यातील 90 ते 95 गावे शिल्लक आहे. अशा परिस्थितीत येत्या चार दिवसात दिवाळी पूर्वी सर्व गावाच्या शेतकऱ्यांना दुष्काळ निधी जमा करण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्याची दिवाळी आम्ही तहसील कार्यालयातच साजरी करण्याकरिता उपोषण हत्यार उपसावे लागतील असाही ईशारा देण्यात आला. संबंधितानी लवकरात लवकर दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आली आहे.