सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : मारेगांव तालुक्यात मागील 3 महिन्यापूर्वी पासुन अतिवृष्टी व पुर परिस्थीतीमुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले असुन आत्ता पर्यंत किमान तालुक्यातील 20 आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मा.जिल्हाधिकारी यांनी भेट घेतली, काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यातही आले. मात्र, तालुक्यात झालेल्या आत्महत्या ह्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळेच झाले असल्याने त्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी काँग्रेस च्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
तालुक्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या, त्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी आहे. अतिवृष्टीचा लाभ मिळणे हा प्रश्न गहन असतांना आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला आर्थिक साहाय्य मिळावी अन्यथा तालुका काँग्रेस कमेटी तर्फे तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
मा.श्री. वामनरावजी कासावार, माजी आमदार, वणी विधानसभा क्षेत्र, मा. श्री. नरेंद्र के. ठाकरे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगांव यांच्या मार्गदर्शनात
मा. सौ. अरुणाताई खंडाळकर, माजी सभापती. जि. प. यवतमाळ, श्री वसंतराव आसुटकर, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगांव, मा. श्री. मारोती गौरकार अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगांव, मा. श्री. शंकरराव मडावी, नगरसेवक, तथा अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी मारेगांव,
रमन डोये आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दुष्काळ निधी व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना आर्थिक साहाय्य देण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आली..