Top News

पि.एम. किसान व अतिवृष्टी मदत खात्यात जमा...


सह्याद्री चौफेर | चेतन पवार 

दारव्हा : तालुक्यातील शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी सोमवारपासून राज्य सरकारने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम जमा करायाला सुरुवात केली. मिळणारी मदत प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये देण्याची घोषणा केली आहे. परंतु नुकसानीची पातळी लक्षात समाधानकारक रक्कम जमा केली जात आहे. त्या सोबत प्रधानमंत्री किसान योजनेचा योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्याचे नावे जमा करण्यात आला आहे

त्याच बरोबर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान निधी अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार सुद्धा इतक्यातच देण्यात येणार आहे.दिवाळीच्या तोंडावर आली आहे. यावर्षी पावसाने पावसाने पिकांचे नुकसान झाले यातून वाचविलेले उरले सुरले सोयाबीन काढणीला पावसाचा व्यत्यय येत आहे. कापुस निघाला नाही. शेतीचा व मुजरांचा खर्च दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न पडला असताना ही मदत शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरली आहे. शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त केले जात असून बँकेत पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली आहे. त्यासाठी बँकेची कर्मचारी सुद्धा रात्री सात आठ वाजेपर्यंत बँक चालू ठेवून पैसे देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया बोरी अरब व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या बोरी अरब या दोन्ही बँकेमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली आहे.
Previous Post Next Post