सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : तालुक्यातील कोना व झोला येथील असंख्य पूर पीडित कुटुंबियांना राम कृषी केंद्राच्या वतीने ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
मागील सात ते आठ दिवसापूर्वी पावसाने थैमान घातले होते, अशातच धरणाचे पाणी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्यानंतर वणी तालुक्यातील जवळजवळ 15 गावं पुरा च्या पाण्याने प्रभावित झाले. अशात विविध स्तरावरून विविध मदत करण्यात येत असतांना "आपण समाजाचे काही देणं लागतं" हीच कायम भावना मनात बाळगून (ता.20 जुलै) रोजी वणी येथील राम कृषी केंद्राचे संचालक राकेशभाऊ वैद्य, नितीनभाऊ ठाकरे, यांनी येथील शेतकरी व शेतमजूरदारांना थंडी पासून बचाव व उब मिळावी म्हणून ब्लॅंकेट स्वरूपात मदत करण्यात आली आहे.
याप्रसंगी राम कृषी केंद्र संचालक व त्यांचा मित्र परिवार पूर पीडितांच्या मदतीला सरसावल्याने नुकसान ग्रस्तानी राम कृषी केंद्राचे आभार मानण्यात आले.