कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीत जनावरांचे पालन करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. चारा प्रचंड टंचाई भेडसावत आहे. पूर ओसरला मात्र, परिस्थिती बिकट आहे. अशातच जनावरांचा चाऱ्यांची समस्या निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. प्रशासनस्तरावरून या सुद्धा गंभीर बाबीकडे लक्ष देण्यात यावे असे बोलल्या जात आहे.
या वर्षीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अशातच बेंबळा प्रकल्पा चे काही दरवाजे उघडण्यात आल्या नंतर पूर परीस्थितीमुळे लोकांच्या शेतीचे, घरादारांचे नुकसान तर झालेच आहे, घरं पडली, मुके जनावर, शेत रखडून गेली, शेती उपयोगी साहित्य, शेत शिवारातील खाताच्या बॅग पाण्यात विलीन झालं असा विविध समस्यांचा असा हाहाकार वणी उपविभागात असतांना सध्या उर्वरित जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे वर्षभऱ्यांसाठी साठवून ठेवलेले जनावरांचा चारा वाहून गेला आहे. तर काहींचा गोठ्यात पुराच्या पाण्याने किड,सडून गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी "माणूस कसाही जगेल परंतु मुक्या जनावरांचे काय?... माझ्या कडे वर्षे भराचा चारा गोठ्यात साठवून ठेवला होता परंतु या पुरामध्ये सर्व खराब होऊन गेला तर काही चारा वाहून गेला आहे." त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची मोठी पंचाईत झाली असून अशा कठीण परिस्थितीत चारा आणायचा कुठून, किंबहुना सर्व जनावरे विकावं लागेल की काय? असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत असल्याचे वनोजा येथील युवा शेतकरी प्रशांत भंडारी यांनी सांगितले आहे.
सध्या पूर बुडाई मुळे शेतकऱ्यांवरं मोठं आर्थिक संकट असून होणाऱ्या चाराटंचाईने पशुपालक हतबल झाला आहेत. त्यातच जनावरांसाठी चारा नसल्याने मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. पर्जन्यमान कमी होत नसल्याने चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला. विकत घेऊन चारा पुरविणे आर्थिकदृष्ट्या सध्या परिस्थिती नसल्याने शेतकरी जनावरे विक्रीस काढल्याशिवाय पर्याय नसल्याने प्रशासनाकडून शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रशांत भंडारी यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून स्थानिक व जिल्हा प्रशासनाला करण्यात येत आहे.
जाहिरातसाठी संपर्क : 9011152179