सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : आज भारतीय कम्युनिष्ट पक्षाने वणी तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी घेऊन उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातून मागण्या पुढीलप्रमाणे :
1)संपुणॆ वणी विभाग यवतमाळ जिल्हयात ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा. 2) वर्धा व पैनगंगा नदीमुळे निर्माण झालेल्या पुरामुळे बाधीत शेतीचे व घराचे सर्वे करुन शेती ला एकरी 50,000 रुपये मदत व घराला 1 लाख रुपये मदत तात्काळ द्यावी व पूर्णतः पडलेले घर नवीन बांधुन द्यावे. 3) पुर परिस्थितीला वकोली (WCL) जबाबदार असल्याने वेकोलीकडुनच वेगळी मदत देण्यात यावी व नदीच्या किनारीचे मातीचे बांध हटविण्यात यावे. 4) घरकुलाचे पुनःसर्वे करुन गरजु लाभार्थ्यांना अंतिम यादीत समावेश करण्यात यावे.
मागणीचे निवेदनकर्ते भाकपचे काॅ.अनिल घाटे, प्रविण रोगे, राहुल खारकर, वैभव डंभारे, गजानन खाडे, राकेश खामनकर, संदीप तुराणकर, राजु वांढरे, संदीप कनाके, सुधाकर बलकी, यांचेसह शेकडो दुष्काळग्रस्त जनता उपस्थित होती.