विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मौजा हिवरी (अर्जुनी) रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या संतोष कोडापे यांच्या शेताजवळील एका अनोळखी इसमाचा मृतदेह अंदाजे (45) वर्षीय आज दि. 10 जुलै ला दुपारी तिन वाजता च्या दरम्यान, काही नागरिकांना मृतदेह दिसून आला.पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करण्यात आला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहेत.