कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
यवतमाळ : महिला महाविद्यालय येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर कुंटेसर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ.तातेड मॅडम उपस्थित होत्या.
प्राचार्य डॉ .कुंटे सर यांनी विद्यार्थिनींना गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे असावे कसे गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे असावे यावर मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मानवी जीवनात गुरूंच्या महत्वाला साधुसंत आणि ऋषी-मुनींनी सुद्धा महत्त्व दिले आहे असे सांगितले. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान उच्च आहे. जरी आपण बालकांच्या आई-वडिलांना पहिला गुरु म्हणतो तरी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी एका गुरुचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. गुरु गुरु आणि शिष्य नाते पारदर्शी असावे. भविष्यातील एक चांगला नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थिनींवर गुरुच प्रभाव टाकतात म्हणून आपल्या शास्त्रामध्ये गुरुचे महत्व विशेष आहे. अशाप्रकारे सुंदर मार्गदर्शन सरांनी विद्यार्थिनींना केले तर इतिहास विभाग प्रमुख प्रो.डॉ.तातेड मॅडम यांनी गुरु म्हणजे काय त्यांचे स्थान विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूंचा आदर व्यक्त करण्याचा,त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते कारण आदिगुरू व्यासांचा जन्म व्यास पौर्णिमेला झाला. निसर्गातील प्रत्येक क्षण आपला गुरु असतो.जे लोक आपल्या जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात ते आपले गुरू असतात. अशा प्रकारे विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना मॅडमनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए भाग 2 ची विद्यार्थिनी कु वैष्णवी वेरुळकर हिने केले तर आभार प्रदर्शन कु. नियती राठोड हिने केले. कार्यक्रमाला एकूण 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ.गाजले, डॉ.सरिता देशमुख, प्रा .गटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.