Top News

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे यावर्षीच्या हंगामाचे पीक कर्ज माफ करा


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : "मोडुन पडला संसार तरी,मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊनी नुसते लढ म्हणा..."
गेल्या पंधरवड्यात आपल्या यवतमाळ जिल्ह्यासह तसेच राज्यभर सर्वदूर पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला असून अनेक ठिकाणी नद्यामुळे,नाल्यामुळे व या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिके जमिनदोस्त झाली आहेत. हिरवागार शालु नेसुन नव्याने नटलेली काळी माय पूर्णतः खरडुन गेली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पोटच्या लेकरावानी वाढवलेली,जपलेली सोन्यासारखी गाईढोर,बैलजोडी या पुरात वाहुन गेलेल्या आहे.वित्तहानी तर मोठ्या प्रमाणात झालीच, परंतु काही ठिकाणी जीवितहानीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत.
शेतकरी बापावर ओढवलेल्या या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. हतबल झालेल्या बळीराजाला उभारी मिळावी,दुबारपेरणीसाठी त्याला मदत मिळावी, त्याचा संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत व्हावा या प्रामाणिक उद्देशाने महामहीम राज्यपाल साहेब व मा.मुख्यमंत्री म.रा.यांना मा.तहसिलदार साहेब दारव्हा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने झालेल्या नुकसानीचे तातडीने हेक्टरी २५,०००/- रुपये मदत सरसकट पंचनामे करण्याची वाट न पहाता देण्यात यावी,  यावर्षी चालु हंगामात घेतलेले पीक कर्ज कुठलीही अट न लावता सरसकट माफकरावे, शैक्षणिक फी माफ करावी,  मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विकासभाऊ पवार यांंच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष रणजित झोंबाडे, तालुका सरचिटणीस विशाल चव्हाण, ईश्वर राठोड, मनविसे तालुका अध्यक्ष गौरव जावरे, तालुका उपाध्यक्ष अमोल राजपल्लू, लक्ष्मण जाधव, प्रणय जिरापुरे, भारत जाधव, यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post