सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : मौजा चारगाव शिरपूर ते कळमना या रस्त्याचे काम चालू असून ते आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चारगाव शिरपूर ते कळमना रोडचे रखडले काम त्वरीत पूर्ण करा, आशयांचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय शिरपूर च्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
पुढे निवेदनात लिहिले आहे की, बहुतेक ठिकाणी कामं झाले नाही. त्यामुळे शिरपूर हद्दीतील चारगाव ते खांदला या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे तिथे वाहन जात नसल्यामुले वाहतुकीने वारंवार अडथळे निर्माण होत आहे. 'त्या' खड्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे, त्यामुळे वारंवार वाहतूक ठप्प होत असल्यामुळे येथील मुला मुलीचे शिक्षणाला अडचण होत असून, नागरिक आपला जीव धोक्यात घालून वाहन चालवत असून कोणत्याही क्षणी कोणता अपघात होईल, सांगता येत नाही. परिणामी या रोडचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशा मागणी शिरपूर ग्रामपंचायत च्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित सरपंच जगदीश बोरपे, उपसरपंच मोहित चचडा, खांदला सरपंच हेमंत गौरकार, एजाज शेख, मिलिंद पाचभाई, हर्षल घोंगे आदी होते.
"मागील आठवड्यात या खडयामुळे शिरपूर जवळ मोठा चक्का ट्रॉलावरील मशीन अलगद घसरली होती त्याच सोबत टिप्पर ही रस्त्याच्या कडेला फसले होते, त्यामुळे या मार्गांवर कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच शिरपूर, चारगाव, खांदला व कळमना या मार्गाने वाहतूक प्रचंड सुरु असते त्यामुळे खड्डे तात्काळ बुजविणे गरजेचे झाले आहे "- प्रवाशी