चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : मौजा नांदेपेरा येथील एका 24 वर्षीय अविवाहित तरुणाने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे.
कुणाल नारायण मत्ते असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या अविवाहित तरुणाचे नाव आहे. कुणालने राहत्या घरी विष प्राशन केले. प्राथमिक उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला चंद्रपूर येथे शासकीय रुग्णालयात भरती केले. चार दिवसापासून तो उपचार घेत होता. मात्र, उपचारादरम्यान आज (21जून) रोजी कुणालचा मृत्यू झाला.
कुणाल च्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याच्या पश्चात वडील आई हे दोघे आहे.