कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : सहकार क्षेत्रात नावाजलेली पतसंस्था म्हणून रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था ही ओळखली जाते. या पतसंस्थेच्या निवडणूकीचा "धुरळा" सुरु झाला असून दोन पॅनल आमने सामने उभे आहेत. 26 जून रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने परिवर्तन पॅनल चे आबड भवन येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन मोठ्या थाटात (ता.20) जून रोजी सायंकाळी डॉ महेंद्र लोढा यांचे हस्ते करण्यात आले.
काँग्रेस नेते माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल च्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने प्रचार कार्याला लागले असून
पतसंस्थेत परिवर्तन घडवून आणलं जाईल यात शंका राहिली नसून मतदारांनाचा कौल ही परिवर्तनाच्या वाटेने दिसून येत आहे.
परिवर्तन पॅनल च्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी डॉ महेंद्र लोढा, जय आबड, राजाभाऊ बिलोरिया, प्रमोद निकुरे, प्रमोद वासेकर, संजय खाडे, अनुप खत्री, वंदना धगडी, मंदा बागडे, वंदना आवारी, मंगला झिलपे, संध्या बोबडे, सविता ठेपाले, माया कोरडे, विजया आगबत्तलवार, व सुरेखा वडीचार यासह परिवर्तन पॅनल चे उमेदवार उपस्थित होते.