कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : कायम स्वरूपी असे काहीच राहत नाही परिवर्तन हा तर निसर्ग नियम आहे. हाच नियम तर रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत लागू होत असून परिवर्तन पॅनल विजयाच्या वाटेने आहे. विरोधकांचा या निवडणुकीत पराभव होणार आहे. हेच खरं चेंजिंग येत्या 26 जून रोजी होऊ घातलेल्या मतदानात पाहायला मिळणार आहे असे बोलल्या जात आहे.
बदल परिवर्तन, मात्र सभासदांनी घडवून आणलेल्या बदलात सहकार ची खूप तगमग होत होताना दिसतेय. मतदार सहकार पॅनल ला निवडणुकीत मतदान करण्यास असमर्थता दाखवत असून "कपबशी" ला निवडणूक देण्यासाठी सभासद खातेदार उत्सुक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
श्री रंगनाथ स्वामी निवडणूक साठी डोअर टू डोअर प्रचार कार्य सुरु असून यात महिला आघाडी व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने प्रचार कार्याला लागली आहे. त्यामुळे परिवर्तनाचे वारे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहू लागले असून परिवर्तन पॅनल चा झंजावत विजय पक्का आहे असे राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चील्या जात आहे.
परिवर्तन पॅनलमध्ये प्रामाणिक, कर्तृत्वान लोकांभिमुख उमेदवार या रिंगणात उतरले आहे. ते आपापल्या क्षेत्रात पारंगत व नावाजलेले असल्याने बेरोजगारी, व्यवसाय, शेती यासाठी भरीव काम होणार आहे म्हणून त्यांचा विजय निश्चित होणार आहे असे एकावयास मिळत आहे. मतदारांना सुद्धा "परिवर्तन" हवा म्हणून परिवर्तनाच्या बाजूने उभे रारू असा ठाम विश्वास दिल्या जात असल्याने मतदारांना पॅनल च्या वतीने येत्या 26 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल कपबशी या चिन्हा समोर फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.