कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
दि. 8 मे रोजी सर्जा राजास ठार मारण्याचे नियोजन तालुक्याच्या बिअरबार मध्ये करण्यात आले होते. त्यानुसार विशाल झाडेंच्या बैठकीला नवरगाव येथील अजित गैबिदास फुलझेले, प्रशांत भोजराज काटकर, रुपेश शंकरराव नैताम सहभागी झाले होते. ठरल्याप्रमाणे नवरगावचे तिघे जनावरांच्या गोठ्या जवळ गेले. आणि विशाल झाडे हा पाळतीवर होता. मात्र, गोठ्यापाशी विलास गौरकार येताच त्यांच्यात झटापट होऊन तिघांनी जागली असलेल्या विलासचा गेम केला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी भाऊ शेतात येताच भावाचा मृतदेहच दिसला. या घटनेबाबत फिर्याद दाखल होताच संशयित विशाल झाडे अडकला. त्याच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड वरून अवघ्या तीन दिवसात घटनेचा छडा लागून नवरगाव येथील तीन आरोपीं असल्याचे निष्पन्न झाले.
चार आरोपीतील प्रशांत काटकर या आरोपीने स्वतःचे कपडे जाळून पुरावा नष्ठ केला त्यामुळे त्याच्यावर अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडाभर विविधांगी बहुचर्चेत असलेल्या मर्डर मिस्ट्रीचे "मास्टरमाइंड" म्हणुन विशाल झाडे व अजित फुलझेले यांची पोलीस दप्तरी नोंद झाली.
मारेगाव पोलिसांनी अतिशय जलदगतीने तपासाला गती देत इंजेक्शन, मोबाईल, गळा आवळणारा दुपट्टा, आरोपींचे कपडे, एल.ए.डी. बॅटरी, चप्पल, मोटारसायकल आदी साहित्य जप्त केले. पीसीआर च्या आज शेवटच्या दिवसाला आरोपींना वणी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. त्यानुसार चारही आरोपींची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.