Top News

भरधाव वाहणाची निलगायला धडक, चालक व सहप्रवासी किरकोळ जखमी तर निलगाय ठार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : बोटोणीजवळ भरधाव चारचाकी वाहनांची एका निलगाय ला जोरदार धडक दिली. या अपघातात निलगाय (रोही) जागीच ठार झाली. ही घटना आज रोजी शनिवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास  घडली.

प्राप्त माहितीनुसार वणीहून एम एच ३४ बि एफ ७००३ सुझुकी (सेलिरिओ) कंपनीची चारचाकी वाहन जळक्याच्या दिशेने जात होते, या कारमध्ये चार प्रवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान राज्य मार्गाने जात असतांना बोटोणी पासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध अचानक एक निलगाय आडवा आली. भरधाव असलेल्या कारने निलगाय (रोही) ला जोरदार धडक दिली. या अपघातात निलगाय जागीच ठार झाली तर, कार रस्त्याच्या कडेला सुमारे शंभर ते दीडशे फुट अंतरावर बाजूला फेकली गेली. 

मात्र, अपघात झाल्यानंतर लगेचच कार मधील एअर बॅग ओपन झाल्याने चालक आणि सहप्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना करंजी व वणी येथे दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन निलगाय ताब्यात घेऊन सदर घटनेचा अधिक तपास करित आहे.
Previous Post Next Post