सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव : प्रभाग क्रमांक १३ मध्ये वास्तव्यास असलेले ज्ञानेश्वर बिहाडे यांच्या घराचे कंपाऊंड गेटचे कुलूप तोडून आज शनिवारला पहाटे तिन ते चार वाजताच्या सुमारास मोटारसायकल चोरून नेली. त्यामुळे शहरात चोरटे आणखीन सक्रिय झाल्याचे चर्चेला उधाण आले आहे.
सदर घटना सकाळी उघडकीस येताच याबाबत ज्ञानेश्वर बिहाडे यांनी रीतसर तक्रार दिली. मोटर सायकल क्रमांक MH- 29 BB- 2038 (हीरो डिलेक्स) कंपनीची दुचाकी लांबवल्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध मारेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या ताब्यातील हिरो (डिलेक्स) दुचाकी क्रमांक (MH-29 BB-2038) घराच्या वॉल कंपाऊंडच्या आत मध्ये पार्क करुन ठेवलेली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी वॉल कंपाऊंड गेटचे कुलूप तोडून दुचाकी चोरून नेल्या प्रकरणी अधिक तपास पोलिस करित आहेत.