Page

मनमानी कारभार करणां-या वराेरा तहसीलदार राेशन मकवानें विरुध्द पाेलिस तक्रार दाखल

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२१ ऑक्टो.) : कुठलेही ठाेस कारण नसतांना चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा येथील महिला तहसीलदार राेशन मकवाने यांनी काेतवालांचे मानधन तथा प्रामाणिकपणे काम करणां-या पटवारी व मंडळ अधिकारी वर्गांचे सणासुदीच्या दिवसात वेतन राेखले आहे.

चाैकशी अंती जिल्ह्यातील इत्तर तालुक्यात सर्वांचे पगार वेळेवर झाले हे येथे उल्लेखनिय आहे. वेतन संदर्भात वराेरा उपविभागाचे तलाठी विनोद खाेब्रागडे यांनी तहसीलदार मकवाने यांचे विरुध्द पाेलिस तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान हे बातमी पत्र लिहीपर्यंत पटवारी ,मंडळ अधिकारी यांचे पगार व काेतवालांचे मानधन मिळाले नव्हते, सध्या वराेरा तहसील कार्यालयाचे नांव बरेच चर्चेत आले आहे.