वणी येथे शिवशंकर मूर्तीची स्थापना

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (७ ऑक्टो.) : विदर्भात प्रसिद्ध असलेले जागृत जैताई देवस्थान येथे नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी भगवान शिवशंकर यांची मूर्तीची स्थापना नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी देवस्थान चे सचिव माधवराव सरपटवार यांनी नगराध्यक्ष यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच ज्यांनी ही सुरेख ध्यानमुद्रेत, प्रसन्न, रेखीव मूर्ती करणारे प्रसिद्ध मूर्तिकार अशोक सोनकुसरे त्यांचा सत्कार चंद्रकांत अणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंदिरातील सदस्य, भाविक भक्त कार्यक्रमाला उपस्थित होते.