Page

कासारबेहळ येथील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागाव, (१४ ऑक्टो.) : नवरात्रीचे औचित्य साधुन कासारबेहळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

महागाव तालुक्यातील कासारबेहळ येथील जागृत वाघाई माता मंदिरात वाघाई माता मित्र मंडळ व महानायक वसंतराव नाईक प्रतिष्ठान सेवानगर कासारबेहळ व शांतीसागर भाऊ इंगोले
रक्त संजीवनी महाराष्ट्र राज्य, ऋषीकेश टनमने, 
लल्लाभाऊ दींडे, विकास चव्हाण, गुरुभाऊ उचाडे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्या शिबिरात गावातील व परिसरातील ३० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेवुन रक्तदान केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी.प.स.सदस्य संदीप ठाकरे, मोहनराव कर्हे, श्रीकांत चव्हाण (रा.कॉ युवा नेते पुसद), रामहरी अडकीने, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल चिकणे, उपाध्यक्षा सौ.प्रा.जयश्री सु.राठोड, प्रसिद्धी प्रमुख गुणवंत राठोड, शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक राजु राठोड, गजेंद्र जामकर, संजय सोनुने, पत्रकार महेश कामारकर, दशरथ राठोड (अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती), विष्णु जाधव (उपसरपंच), अशोक कर्हे (पोलीस पाटील), अशोक तुमवार (माजी उपसरपंच), सुखदेव राठोड, उत्तम नाईक, ताराचंद चव्हाण, वरोडी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार मस्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन जाधव, आशु कर्हे, गोपाल कर्हे, दिलीप पिठलेवाड, सुहास बिचकुले, मनोहर राठोड, अजेश जाधव यांनी परिश्रम घेतले.