टॉप बातम्या

शेतकरी बांधवांनसाठी शितगृह (cold storage) जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीने उभारावे - गजानन बेजंकीवार सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०१ संप्टें.) : जिल्हातील अनेक शेतकरी फळ बागायती व भाजीपाला उत्पन्न घेत आहेत त्यांना शितगृह (cold storage)ची व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्याचे पिक कमी दरात विकावे लागते किंवा पिक सडून जात आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकरी करीता शितगृह ची व्यवस्था केल्यास अनेक शेतकरीना त्याचा फायदा होईल व उत्पन्नात वाढ होईल यासाठी गजानन बेजंकीवार यांनी मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी केली होती. त्या अनुषंगाने दि. २५/८/२१ रोजी चे पत्राद्वारे मा प्रकल्प संचालक (आत्मा) यवतमाळ यांनी जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीना प्रस्ताव सादर करण्याचे कळविले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील प्रस्ताव सादर करण्यार् या कृषि उत्पन्न बाजार समिती ना शितगृह उभारण्यासाठी कृषि पायाभूत सुविधा अंतर्गत २ कोटी रूपये पर्यन्त कर्ज 3% व्याज दराने ७ वर्ष मूदती पर्यन्त मिळणार असून ६०% अनुदान स्मार्ट प्रकल्प अंतर्गत व ३५% अनुदान राष्ट्रीय फलोत्पादन कडून मिळणार आहे.तरी जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीने आपले प्रस्ताव त्वरीत सादर करावे असे गजानन बेजंकीवार सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा यांनी आव्हान केले आहे.
Previous Post Next Post