Page

कामगारांची पिळवणूक थांबवा व परप्रांतीय नविन कामगारांना त्वरीत बंद करावे, न केल्यास आंदोलन करू - माजी खासदार नरेश पुगलीय यांचा ईशारा

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२५ ऑगस्ट) : पूर्वाश्रमीच्या मुरली सिमेंटच अधिग्रहण भारतातील नामंकित दालमिया भारत सिमेंट या उद्योगाने केले. त्यामुळे मुरली सिमेंट कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु दालमिया सिमेंट व्यवस्थापनेने उद्योग सुरु करून ही जुन्या स्थायी कामगारांना कामावर घेतले नाहीच. पण बाहेर प्रांतातून कामगार आणून त्यांना फक्त ३०० ते ३५० रु. रोजी देवुन कंत्राटदारामार्फत स्थायी स्वरुपाचेही काम करवून घेतल्या जात आहे. जेव्हा जिल्ह्यातील इतर सिमेंट उद्योगातील स्थायी कामगारांना ३५ ते ४० हजार रु. प्रतिमहा तथा बोनस एक्सप्रेसीया राहण्यास वसाहतीत घरे, मेडिकल सुविधा व्यवस्थापनाव्दारे पुरविल्या जात आहे.
दालमिया भारत सिमेंट उद्योगात जुन्या मुरली सिमेंट उद्योगातील लोडींग कामगारांना डावलून बाहेर पर प्रांतातून नविन कामगारांना आणून त्यांना फक्त ५०० रु. रोजी देवून कायदे धाब्यावर बसवून त्याचेही शोषण सुरु केलेले आहे. परंतु इतर सिमेंट उद्योगात लोडींग कामगारांना १३५० रु. प्रति दिन मजुरी आहे. तरी परप्रांतीय नविन कामगारांना त्वरीत हटविण्यात यावे.
दालमिया उद्योग सिमेंट व्यवस्थापनाने खालील मागण्या : 
 १) मुरली सिमेंटच्या कामगारांना जुन्या पूर्व पदावर त्वरीत कामावर घेण्यात यावे.
२) लोडींग विभागातील परप्रांतिय कामगारांना वगळून जुने व स्थायी लोडींग कामगारांना घेण्यात यावे. ३) प्रकल्प ग्रस्त व जुन्या कंत्राटी कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे.
४) इतर उद्योगाप्रमाणे सिमेंट वेज बोर्ड लागू करण्यात यावे. 
५) सर्व कामगारांना कैटींग व येण्या-जाण्याची सुविधा देण्यात यावी.
६) सिमेंट लोडिंग विभागात इतर सिमेंट उद्योगातील काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना वेज बोर्ड अवार्ड नुसार १३५० रु. रोजी प्रति दिवस तथा इतर सुविधा देण्यात याव्या.
उपरोक्त सर्व कामगारांचे शोषण दालमिया सिमेंट उद्योगाने त्वरीत थांबवून वरील मागण्यांची पूर्तता त्वरीत करावी. दालमिया सिमेंट या नामकीत कंपनीने मुरली सिमेंटचे हस्तांतरण केल्यामुळे परिसरातील जनता जुने कामगार सर्वाचा आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु दालमिया सिमेंट उद्योगाने कामगारांचे व स्थानिक जनतेचे शोषण सुरु केल्यामुळे तसेच व्यवस्थापनाने कामगारांच्या वरील मागण्या मान्य न केल्यास तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील इतर सिमेंट कामगार संघटनांची सोबत घेवुन लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दालमिया सिमेंट उद्योगातील व्यवस्थापनाने तथा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेवून दालमिया सिमेंट उद्योगातील कामगारांना तसेच परिसरातील जनतेला न्याय द्यावा. 
जर कामगारांनी तिव्र आंदोलन केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही व्यवस्थापनांची राहील याची नोंद घ्यावी.

दिनांक २४ आगस्ट रोजी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे पत्र घेऊन चंद्रपूर चे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन दालमिया कंपनी मध्ये कामगारांची होणारी पिळवणूक व परप्रांतीय नवीन कामगारांची भरती होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी शिष्टमंडळ विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, इंटक चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, दालमिया सिमेंट कामगार संघटनेचे महासचिव श्रीनिवास गाडगे, कार्यध्यक्ष उत्तम उपरे, तसेच सदस्य उपस्थित होते.