चंदनखेडा येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० ऑगस्ट) : इनरव्हील क्लब ऑफ वरोरा व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनखेडा येथे मोफत नेत्रोपचाराचे तपासणी चे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची खासियत,या शिबिरात योग्य दराचे चस्मे वाटप करण्यात आले. तसेच ज्यांना ऑपरेशन ची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची योग्य किंमतीत ऑपरेशन केले. तसेच शिबिरातील इनरव्हील क्लब च्या वतीने दोन रुग्णांचा ऑपरेशनचा खर्चही भरला गेला.

या कार्य प्रसंगी वरोरा येथील डॉ. लांबट नेत्र तज्ञ् यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी चंदनखेडा येथील डॉ.संतोष झाडे वैद्यकीय अधिकारी, डॉ.जयश्री भोंगळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुळेवार, सरपंच नानाजी जांभुळे, उपसरपंच भारती उरकांडे, डॉ.जगदीश बोढे, रुग्णवाहिका चालक पवन भोस्कर तसेच आशा वर्कर बुरावार आणि तालेवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला आहे.  

सुमारे 500 लोकांनी या शिबिरामध्ये लाभ घेतला. या कार्यक्रमात इनरव्हील अध्यक्षा मधू जाजू, सचिव सौ.À वंदना बोढे, सदस्य दिपाली टिपले, माजी अध्यक्षा तथा अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्षा सौ. माया बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजित कार्यक्रमाचे संचालन सौ. माया बजाज यांनी केले तर मधू जाजू यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी क्लब व संमेलनाच्या सर्व पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post