टॉप बातम्या

मेघा ताई एक उत्तम शिक्षिका

 
संकलन : किरण घाटे

मेघा ताई या एक उत्तम शिक्षिका आहेत, त्याच सोबत साहित्य क्षेत्रात त्या अग्रेसर असून त्यांनी वृत्त पत्रातून स्त्री विषयक विपुल लेखन केले आहे. आकाशवाणी वर त्यांचे बरेच कार्यक्रम झालेले आहे. त्यांना अभिनयाची तसेच नृत्याची खूप आवड आहे. त्या आपल्या कलेतून त्यांनी सावित्रीबाई फुले बोलतेय, विवेकानंद, बाबांना श्रद्धांजली, मोबाईलचा गोंधळ ती फुलराणी असे अनेक एकपात्री प्रयोग सादर करून रसिकांची मने जिंकली, त्यांनी आजवर अनेकदा रक्तदान केलेले आहे.

सामाजिक वनीकरण या माध्यमातून त्या वृक्षारोपण करीत असतात. २०१९ मधे त्यांना महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ नाशिक येथे त्यांनी कृतीसत्रात सहभाग घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.आजपर्यंत बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. २०१९ मधे नवरत्न साहित्य परिषद अहमदनगर यांच्या तर्फे ताईंना नारी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना कविता लेखनाची सुध्दा आवड असून लवकरच त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचे विषयी लिहावे तेव्हढे कमीच आहे.

सहजं सुचलं महिला व्यासपीठासाठी मायाताई काेसरे, विजया भांगे, प्रभा अगडे, सुविधा बांबाेडे, विजया तत्वादी, डॉ.अंजली साळवे यांचे सह अधिवक्ता मेघाताई धाेटे यांचे योगदान फार माेलाचे व तेव्हढेच महत्वाचे आहे. हे विसरता येण्यासारखे नाही.

-साै.स्मिता बांडगे
शिक्षिका मूल जि.चंद्रपूर
मो. ९४२१७१८३४७
Previous Post Next Post