सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (२५ ऑगस्ट) : दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी विश्व सहयोग बहुद्देशिय सेवाभावी संस्था व चांगुलपणा चळवळ समाजसेविका सौ.अरूणा पुरोहित नागपूर व श्री डाॕ.चंद्रकांतजी कापसे नागपुर यांच्या मार्गदर्शनात व संयुक्त विद्दमाने किनवट तालुक्यातील शिवशक्तीनगर (घोगरवाडी) येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी संभाव्य तिसऱ्या लाट व आरोग्य सुदृढ राहावे म्हणून बिस्किटे, ज्युस, सोनपापडी खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिरूद्ध केंद्रे सरानी मार्गदर्शन केले, सरपंच श्री.मारोती आञाम यानी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका कु.कोमल मरस्कोल्हे, संचालक श्री. रामकृष्ण केंद्रे, यागावचे श्री. दत्ता वेट्टी समाज सेवक व गावातील महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.