श्री रंगनाथ स्वामी संगीत क्लासेस च्या वतीने बालगंधर्व जयंती साजरी


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (८ जुलै) : येथील श्री रंगनाथ स्वामी संगीत क्लासेस च्या वतीने दिनांक ७ जुलै २०२१ ला बालगंधर्व जयंती साजरी करण्यात आली. या जयंती दिनी सर्व विद्यार्थ्यांनी बालगंधर्व यांना मानवंदना देऊन नाट्य गीत सादर केले. 

श्री रंगनाथ स्वामी संगीत क्लास चे विद्यार्थी अमरावती येथील अमरावती कलामंच संस्थे द्वारा आयोजित 'बालगंधर्व' उत्सव या होणाऱ्या उत्सवात गायन करणार आहे अशी माहिती संगीत विद्यालयाचे संगीत शिक्षक अजित खंडारे सर यांनी दिली. 

या जयंती दिनी सर्व विद्यार्थ्यांनी बालगंधर्व यांना मानवंदना देऊन नाट्य गीत सादर करण्यात आले. यावेळी निखिल तेलंग, प्रफुल पंधरे, तन्वी दोडेवार, कल्याणी जुनगरी, शर्वरी बविसकर, पूजा देवाळकर, देवयानी डोळस, वेदी कोणप्रतीवार, इत्यादीनी गायन केले.

या कार्यक्रमला लाभलेले श्री.नामदेव ससाणे, अक्षय करसे, अमोल बावणे, आकाश महाडुळे, सतीश बाविस्कर, संजय जुनगरी इत्यादी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर घुगरे यांनी केले.